शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

अमित शहा, मुख्यमंत्र्यांचा आज सोलापुरात रोड शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 14:34 IST

महाजनादेश यात्रेचा समारोप; पार्क स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता होणार जाहीर सभा

ठळक मुद्दे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सोलापूर दौºयावर- अमित शहाच्या दौºयामुळे सोलापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त- इंदिरा गांधी मैदानावर होणार सायंकाळी सातच्या सुमारास जाहीर सभा

सोलापूर  : भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज रविवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. जुना पुणे नाका ते पार्क चौक या मार्गावर अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. यानंतर पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून विधानसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत संकेत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा आयोजित केली होती. २३ जिल्ह्यांचा प्रवास संपवून ही यात्रा रविवारी सोलापुरात पोहोचत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला महाजनादेश यात्रेचा रथ जुना तुळजापूर नाका येथे दाखल होईल. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी स्वागत करतील. सायंकाळी ६.३० वाजता हा रथ जुना पुणे नाका येथे दाखल होईल. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचतील. अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो शिवाजी चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल होईल. सायंकाळी सात वाजता पार्क स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा होईल. 

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे. दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहे. रविवारी होणाºया जाहीर सभेतून युतीच्या जागा वाटपाबाबत संकेत मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे.

मेगा भरतीची शक्यता महाजनादेश यात्रेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री, पदाधिकारी रविवारी सायंकाळी सोलापुरात येत आहेत. जनादेश यात्रेच्या मंचावर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह ३० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी काही नेत्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपा