शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Amit Thackeray in Aurangabad: राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 21:23 IST

Amit Raj Thackeray in Aurangabad: राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जंगी सभा आहे. या सभेवरून राज्यातील पुढचे वातावरण कसे असेल ते ठरण्याची शक्यता आहे. या सभेला आधी परवानगी नाही नाही म्हणत अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. यामुळे मनसेचे कार्यकर्ते जोमाने सभेच्या तयारीला लागले आहेत. अशातच या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेऔरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. 

राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. अमित औरंगाबादमध्ये एन्ट्री करत असताना एक अजब घटना घडली. त्यांचा रस्ता चुकला आणि जिथे जायचे होते, तिथे ते पोहोचू शकले नाहीत. इकडे मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हारतुरे घेऊन जमले होते. 

त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात बाबा पट्रोल पंपावर हजर होते. कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. पण अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपावर न जाता ते त्यांच्या औरंगाबाद येथील मुक्काम स्थळी पोहोचले. ही सगळी गडबड त्या जीपीएसने केल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. अमित ठाकरेंच्या कारला मुक्काम स्थळी जाण्यासाठी जीपीएसने जवळचा आणि वाहतूक कोंडी नसलेला रस्ता दाखविला. याबाबतचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरेAurangabadऔरंगाबाद