देशातील गरिबांचा पैसा अमेरिकेतील उद्योगपतींच्या खिशात - राहुल गांधी
By Admin | Updated: October 10, 2014 14:21 IST2014-10-10T14:18:28+5:302014-10-10T14:21:42+5:30
भारतातील गरिबांचा पैसा अमेरिकेतील उद्योजकांच्या खिशात घालण्याचा डाव मोदी सरकारने रचल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

देशातील गरिबांचा पैसा अमेरिकेतील उद्योगपतींच्या खिशात - राहुल गांधी
>ऑनलाइन लोकमत
दिंडोरी, दि. १० - भारतातील गरिबांचा पैसा अमेरिकेतील उद्योजकांच्या खिशात घालण्याचा डाव मोदी सरकारने रचल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यात उद्योगधंदे असायलाच हवे पण सरकार मात्र जनतेचे हवे, उद्योगपतींचे नको असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील दिंडोरी येथील प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसने मोफत औषध देण्याची योजना काँग्रेस सरकारने सुरु केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यात काही उद्योगपतींनी मोदींची भेट घेऊन औषधांचे दर नियंत्रणमुक्त करण्याची मागणी केली होती. या दिशेने मोदी सरकारने प्रयत्नही सुरु केले आहेत असा आरोपही राहुल गांधींनी केला. गुजरातपेक्षा महाराष्ट्र अव्वल आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.चीन व पाकिस्तानच्या कुरापाती सुरु असतानाच पंतप्रधान शांत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.