प्रबोधिनीबाबतचे आक्षेप गैरसमजुतीवर आधारित
By Admin | Updated: August 12, 2015 02:32 IST2015-08-12T02:32:28+5:302015-08-12T02:32:28+5:30
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन येथील प्रशिक्षण केंद्रात अलीकडेच झालेल्या शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे निमित्त करून काही राजकीय मंडळींनी व्यक्त केलेली भडक व बेजबाबदार

प्रबोधिनीबाबतचे आक्षेप गैरसमजुतीवर आधारित
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन येथील प्रशिक्षण केंद्रात अलीकडेच झालेल्या शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे निमित्त करून काही राजकीय मंडळींनी व्यक्त केलेली भडक व बेजबाबदार विधाने गैरसमजुतीच्या आधारावर केलेली असून खळबळ उडवून देणे हाच त्यामागील हेतू असल्याचे मत प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.
‘शिक्षण खात्याच्या कारभारात संघाची लुडबुडह्ण या शीर्षकाखाली लोकमतच्या ८ आॅगस्ट रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना साठे म्हणतात की, म्हाळगी प्रबोधिनीची ओळख वैचारिक संस्था अशी असून विविध राजकीय पक्षातर्फे त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सबलीकरणाकरिता प्रशिक्षणाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. भाजपाच्या विरोधात असलेल्या काही विचारवंतांनीही प्रबोधिनीचे काम पाहून प्रशंसा केली असून संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक-सोशल कौन्सिलने विशेष सल्लागार संस्थेचा दर्जा दिला आहे. मात्र काही विचारांशी वैचारिक अस्पृश्यता मानणाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचा विपर्यास करून संस्थेवर केलेली टीका अन्यायकारक आहे. (प्रतिनिधी)