अंबरनाथ-बदलापूर आणि पनवेल महापालिका होणार ?
By Admin | Updated: December 9, 2015 10:40 IST2015-12-09T10:29:00+5:302015-12-09T10:40:03+5:30
वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे.

अंबरनाथ-बदलापूर आणि पनवेल महापालिका होणार ?
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
सध्या अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन स्वतंत्र नगरपरिषदा आहेत या दोन्ही नगरपरिषदांचे एकत्रीकरण करुन स्वतंत्र महापालिका आणि नवी मुंबईतील पनवेल, उलवे, कळंबोली आणि खारघर यांची स्वतंत्र पनवले महापालिका स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
महापालिका स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या हा संपूर्ण परिसर मएमआरडीए क्षेत्रात येतो. या दोन नव्या महापालिका प्रत्यक्षात आल्या तर, ठाणे जिल्ह्यात एकूण नऊ महापालिका होतील.