अंबादास दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे OBC प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 02:05 PM2023-09-30T14:05:06+5:302023-09-30T14:05:38+5:30

हा संपूर्ण खेळ राज्यात सुरू आहे हे आमच्या ओबीसी नेत्यांना का कळत नाही हा खरा प्रश्न आहे सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी तरुणांनी करावी असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले.

Ambadas Danve Maratha still have OBC certificate; Vijay Vadettivar claim | अंबादास दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे OBC प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा दावा

अंबादास दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे OBC प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा दावा

googlenewsNext

नागपूर – सरकारकडून सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. जे सांगतायेत ओबीसी आरक्षणाचा वाटा कुणाला देणार नाहीत म्हणतात, ओबीसी प्रमाणपत्रे देणार नाही म्हणतायेत. परंतु राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेमराठा आहेत. त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रही घेतलंय असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र देत जात वैधता प्रमाणपत्रेही देण्यात आली. हे काम झपाट्याने सुरू आहे. गुपचूपपणे सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. मग आरक्षणाचा आणि बैठकीचे सोंग सरकार कशाला करतंय याचे उत्तर ओबीसी समाजाने विचारले पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच आरक्षण संपवण्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार पाडत आहे. कारण शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे या सरकारने कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे मंत्रालयातील कक्ष अधिकारीही मनुवादी विचाराचे बसलेले दिसतील. विशिष्ट विचारधारेचे लोक तहसिल कार्यालयात तहसिलदार म्हणून बसतील. संपूर्ण मेरिट डावलून मर्जीतील लोकांना बसवले जाईल. हा संपूर्ण खेळ राज्यात सुरू आहे हे आमच्या ओबीसी नेत्यांना का कळत नाही हा खरा प्रश्न आहे सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी तरुणांनी करावी असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले.

अंबादास दानवेंनी फेटाळला आरोप

मी कुठलेही जात प्रमाणपत्र घेतले नाही, त्यामुळे जात वैधतेचा संबंध येत नाही. विजय वडेट्टीवार यांनी का आरोप केले त्यांना विचारा. ज्यांच्याकडे वंशावळी, नातेवाईकांचे रेकॉर्ड त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जातेय. वंशावळीचे प्रमाण असेल तर सर्टिफिकेट मिळते. माझ्याकडे कुठलेही प्रमाणपत्र नाही. मी कुठल्या समाजाचा नेता नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. मी मराठा, मी ओबीसी असं म्हणणार नाही. माझी जात माझ्याकडे राहील मी सार्वजनिक का करेन. ज्या बातमीत दम नाही त्याला जाब का विचारू असा सवाल करत अंबादास दानवे यांनी विजय वडेट्टीवारांचा आरोप फेटाळून लावला.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी चुकीची नाही. परंतु कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण मिळावे. आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल. कुणबी आणि मराठा फरक आहे. माझ्याकडे पावणे चारशे वर्षापूर्वीचे वंशावळीचे पुरावे आहेत. परंतु मी प्रमाणपत्र घेतलेले नाही. माझ्या ७ पिढ्यांचे रेकॉर्ड आहेत. मला प्रमाणपत्राची गरज नाही. मी खुल्या प्रवर्गातून निवडणुका लढल्या आहेत. मला जातीच्या प्रमाणपत्राची गरज नाही असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Web Title: Ambadas Danve Maratha still have OBC certificate; Vijay Vadettivar claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.