अंबाबाईची धनधान्य लक्ष्मी रूपात पूजा
By Admin | Updated: October 14, 2015 18:16 IST2015-10-14T18:15:40+5:302015-10-14T18:16:03+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची धन-धान्य लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.

अंबाबाईची धनधान्य लक्ष्मी रूपात पूजा
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १४ - शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची धन-धान्य लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी देवीची सिंहवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. छत्रपती घराण्याच्या युवराज्ञी संयोगीताराजे यांनी भवानीदेवीची पूजा बांधली.
नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते अंबाबाईचा शासकीय अभिषेक करण्यात आला. दुपारच्या आरतीनंतर देवीची धनधान्य लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. अष्टलक्ष्मीतील दुसरी देवता आहे श्री धनधान्य लक्ष्मी. ही देवता भक्तांच्या दारिद्रय़ाचा नाश करून गजांत लक्ष्मी व अन्नधान्याची समृद्धी करते त्यानुसार धनधान्य लाभासाठी या देवतेची उपासना केली जाते. ही पूजा श्रीपूजक सिद्धार्थ देशपांडे, दीपक कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, आलोक कुलकर्णी, अनिरुद्ध कुलकर्णी यांनी बांधली.