अंबाबाई देवीवंदना रूपात
By Admin | Updated: September 26, 2014 18:45 IST2014-09-26T18:44:26+5:302014-09-26T18:45:12+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली.

अंबाबाई देवीवंदना रूपात
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने आज अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर देवीची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथातील संदर्भानुसार असून, ती गुरू मुनीश्वर व रवी माईनकर यांनी बांधली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई ही जगदाद्यशक्ती असून, विश्वाचे सार्मथ्य तिच्या ठायी एकवटले आहे. म्हणून या देवीची इंद्राने अहिल्येच्या अपहाराच्या पातकातून आपली मुक्ती व्हावी यासाठी आराधना केली. पराशर ऋषींच्या तपात विघ्न आणू पाहणार्या नागांचे दुष्टत्व याच करवीराची यात्रा करताना नष्ट झाले. विनितापुत्र गरुड हे विष्णूचे वाहन. नागांशी असलेले वैर विसरून तो या करवीरात एक देवीभक्त म्हणून देवीसमोर हातात नाग धरून उभा राहिला आहे. व्यासांच्या जन्मापूर्वी लोकोद्धाराची भावना मनात ठेवून ऋषी पराशर आणि त्यांची पत्नी सत्यवती यांनी पन्हाळ्यावर तप केले. तपपूर्तीवेळी देवीने त्यांना दर्शन देऊन त्यांच्या मनातील विष्णू व देवी यांच्यातील भेद दूर केला आणि व्यासांसारखा लोकोद्धारक पुत्र होईल, असा त्यांना आशीर्वाद दिला.