नाशिकचे अमरनाथ यात्रेकरू सुखरूप, जम्मूच्या दिशेने रवाना

By Admin | Updated: July 11, 2016 13:50 IST2016-07-11T13:42:37+5:302016-07-11T13:50:40+5:30

तणावपूर्ण वातावरणामुळे काश्मिरमध्ये अडकून पडलेले नाशिकमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले भाविक सुखरूप असून सुमारे 25 हजार भाविकांच्या बसेस जम्मूच्या दिशेने रवाना झाल्या.

Amarnath Yatra of Nashik leaves towards Sukhodi, Jammu | नाशिकचे अमरनाथ यात्रेकरू सुखरूप, जम्मूच्या दिशेने रवाना

नाशिकचे अमरनाथ यात्रेकरू सुखरूप, जम्मूच्या दिशेने रवाना

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ११ -  तणावपूर्ण वातावरणामुळे काश्मिरमध्ये अडकून पडलेले नाशिकमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले भाविक सुखरूप असून सुमारे 25 हजार भाविकांच्या बसेस रविवारी (दि. 10) रात्री अकरा वाजता मिलिटरी बंदोबस्तात जम्मूकडे रवाना करण्यात आल्या. अमरनाथचे दर्शन घेऊन परतत असताना काश्मीर घाटीतील हिंसाचारामुळे भाविकांना बालतालमध्ये रोखण्यात आले होते.  विशेष म्हणजे भाविकांसाठी असलेल्या लंगरमधील भोजनव्यवस्थाही संपुष्टात आल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले. अखेर तीन दिवसांनी सर्व यात्रेकरू कडेकोट बंदोबस्तात जम्मूकडे रवाना झाले आहेत. सर्व यात्रेकरू सुरक्षित असून यामध्ये नाशिकच्या 50 भाविकांच्या एका वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती या वाहनातील भाविक हेमंत अगरवाल यांनी दिली. 
काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करून हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खो-यात तणावाचे वातावरम निर्माण झाले होते. हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी शुक्रवारी एका चकमकीत खातमा केल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला व अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आली.
 
 आणखी वाचा 
(अमरनाथ यात्रा दुस-या दिवशीही स्थगित, काश्मीरमध्ये संचारबंदी)
(अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल)
  •  
 
 
  •  
 

 

Web Title: Amarnath Yatra of Nashik leaves towards Sukhodi, Jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.