शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यावर टीका झाली असली तरी एका गोष्टीचं बरं वाटलं की..."; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:17 IST

अमित शाह यांनी नुकताच दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा केला.

Supriya Sule vs Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही. केंद्र सरकार ईस्ट इंडिया कंपनीसारखे सर्व राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. पक्ष फोडा, घरं फोडा या पॉलिसी विरोधात व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आगामी निवडणुका महत्वाच्या असणार आहेत. आमच्यावर काहीही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर खोचक टोला लगावला. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. बूत कमिटी आणि प्रचार कशाप्रकारे करायचा या संदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापूर्वी अनेक निवडणुका एकत्रित लढलेले आहे. मागची ५५ वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावं ठेवतोच, कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही. त्यामुळे अमित शाह आले होते आणि त्यांनी शरद पवार साहेबांवर टीका केली. जर टीका केली नसती तर हेडलाईन झाली नसती."

"विधानसभेत झालेली मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार, कोयता गँग व ड्रग्सवर अमित शाह बोलले असते तर आनंद झाला असता.  गेल्या ६० वर्षांत पवार साहेबांवर अनेकांनी टिका केली पण ते काम करत राहिले, कुणाला उत्तर दिले नाही. सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतो. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत. आता लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. नेहमीप्रमाणे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मी प्रचार करते आहे. ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. परंतु निवडणूक ही विचारांनी लढली जाते. आमच्यावर जी काही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. तरी सुद्धा अमित शाहा यांनी जी टीका केली तो त्यांचा हक्क आहे," असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAmit Shahअमित शाहNCPराष्ट्रवादी काँग्रेस