शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'अलमट्टी'चा प्रश्न न्यायप्रविष्ट, उंची वाढीस परवानगी देणार नाही; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:26 IST

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे : लोकप्रतिनिधींची मागणी

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणाबाबत तेलंगणा सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्याबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याने अलमट्टीप्रश्नी केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी दिले. कर्नाटक सरकारने उंची वाढीबाबतचा दिलेला प्रस्ताव परत पाठविल्याचेही ते म्हणाले.दिल्लीत सोमवारी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, या मागणीसाठी मंत्री पाटील यांच्यासोबत महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यांनी भेट घेतली. या बैठकीस महाराष्ट्राचे खासदार, आमदार, कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे प्रतिनिधी आणि जलसंपदा, कृष्णा खोरे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला सातत्याने महापुराचा फटका बसत आहे. २००५ पासून सातत्याने पुराने आर्थिक हानी होत आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठची गावे भयभीत झाली आहेत. केंद्र सरकारने अलमट्टी धरणाच्या उंचीला परवानगी दिल्यास ही गावे कायमस्वरूपी पाण्याखाली राहण्याची भीती व्यक्त करीत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय जलशक्तीमंत्री पाटील यांच्याकडे अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला जोरदार विरोध दर्शवला. केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले.

त्यानंतर सी. आर. पाटील म्हणाले, तेलंगणा राज्य नव्याने निर्माण झाले आहे, त्यांना त्यांच्या वाट्याचे पाणी मिळत नसल्याने अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अलमट्टी उंचीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने केंद्र सरकार अलमट्टीबाबत हस्तक्षेप करणार नाही. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र तेलंगणा सरकार न्यायालयात गेल्याने निर्णय प्रलंबित ठेवला आहे. उंचीवाढीचा विषय न्यायप्रविष्ट बनल्याने केंद्र सरकार कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंचीवाढीला तूर्त परवानगी देणार नाही.

विसर्गाबाबत पुनर्पडताळणीचे आदेशखासदार विशाल पाटील यांनी बैठकीत कृष्णा नदीवर अलमट्टी धरणाच्या वरील बाजूस हिप्परगी बॅरेज आहे. येथेही नियम डावलून पाणीसाठा केला जात आहे. याबाबतही धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर केंद्रीयमंत्री पाटील यांनी हिप्परगी बॅरेजमुळे येणारा फुगवटा कमी करण्यासाठी विसर्गाबाबत पुनर्पडताळणीचे आदेश देण्यात येईल, असेही सांगितले.

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे : लोकप्रतिनिधींची मागणीमंत्री सी. आर. पाटील यांच्या भेटीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत महाराष्ट्र सदनमध्ये बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंची न वाढविण्याच्या मागणीवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि पाणी व्यवस्थापनावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, अशी महाराष्ट्राची भूमिका आहे. त्यामुळे याप्रश्नी राज्य शासनानेही तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

वडनेरे समितीच्या अहवालावरच 'अलमट्टी' उंची वाढीचा प्रस्तावअलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर येत नसल्याबाबतचा अहवाल राज्याचे माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या समितीने सादर केला होता. त्यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी उंचीवाढीबाबतचा निर्णय घेतला होता, असेही खासदार, आमदार म्हणाले. कर्नाटकने याबाबत अभ्यास करण्याची गरज होती, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दुर्लक्ष केले होते. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने उंचीवाढीचा निर्णय घेतला होता, असेही बैठकीत सांगण्यात आले.