मनोधैर्यअंतर्गत दोन कोटींच्या अनुदानाचे वाटप
By Admin | Updated: February 12, 2015 05:49 IST2015-02-12T05:49:15+5:302015-02-12T05:49:15+5:30
मनोधैर्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

मनोधैर्यअंतर्गत दोन कोटींच्या अनुदानाचे वाटप
पंकज रोडेकर, ठाणे
मनोधैर्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. दोन वर्षांत दाखल ४२८ प्रकरणांपैक ी ४१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात बाल लैंगिक अत्याचारांची सर्वाधिक २५१ प्रकरणे आहेत. तसेच आठवड्यातून सरासरी १० केसेस दाखल होत आहेत. यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सर्वाधिक गुन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला व बालकल्याण विभागांतर्गत पीडितांना ‘जिल्हा क्षती साहाय्य व पुनर्वसन’ म्हणून अनुदानाचे वाटप केले जाते. २ आॅक्टोबर २०१३ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान जिल्ह्णातील ठाणे शहर-ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रांत एकूण ४२८ अत्याचारांची प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ४१४ प्रकरणे निकाली काढून १३४ पीडितांना दोन कोटी ४३ लाखांचे अनुदानवाटप केले आहे.
२८० पीडितांना अनुदानाचे वाटप बाकी आहे. यामध्ये पीडितांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते़ अॅसिड प्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही.