राज्यांमध्ये 33 हजार कोटींच्या पर्यावरण निधीचे वाटप करणार
By Admin | Updated: July 27, 2014 00:31 IST2014-07-27T00:31:24+5:302014-07-27T00:31:24+5:30
पर्यावरण मंत्रलयाचा कारभार हाती घेतला तेव्हा काही कारणांमुळे 33 हजार कोटी रुपयांचा पर्यावरण निधी पडून असल्याची माहिती मला मिळाली,

राज्यांमध्ये 33 हजार कोटींच्या पर्यावरण निधीचे वाटप करणार
पुणो : पर्यावरण मंत्रलयाचा कारभार हाती घेतला तेव्हा काही कारणांमुळे 33 हजार कोटी रुपयांचा पर्यावरण निधी पडून असल्याची माहिती मला मिळाली, त्या अडचणी दूर करून या निधींचे सर्व राज्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधल्या बारीपाडा या गावाने चैत्रमजी पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 11 हजार एकरचे घनदाट जंगल राखले, त्यानिमित्त त्यांना आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय वनवासी कल्याण आo्रमाच्या वतीने पवार यांचा जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी खासदार अनिल शिरोळे, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे, रवींद्र वंजारवडकर, दिलीप मेहता उपस्थित होते. चैत्रम पवार यांनी बारीपाडय़ामध्ये उभे केलेल्या कामाची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली.जावडेकर म्हणाले, ‘‘जैवविविधता राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. जंगल राखले गेले, तर जैवसाखळी टिकेल. आपल्या देशात 23 टक्के इतक्या भूभागावर जंगल आहे, ते आगामी काळात 33 टक्क्यांर्पयत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. माधव गोगटे म्हणाले, की चैत्रम पवार यांच्या बारीपाडयासारखे अनेक बारीपाडे उभे राहिले पाहिजेत. चैत्रम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विचार व्यक्त करण्यासाठी उभे राहिलेल्या प्रकाश जावडेकर यांनी ‘खूप काम करणारी माणसं खूप कमी बोलतात,’ अशा शब्दांमध्ये त्यांचा गौरव केला.(प्रतिनिधी)
झाडामागे एक रूपया द्या!
झाडे लावण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेतात, त्यांना केंद्र शासनाने एका झाडामागे एक रूपया इतके अनुदान द्यावे. शासनाला एक झाड लावण्यासाठी 25 रूपये खर्च येतो, तेच काम स्वयंसेवी संस्थेकडून अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. त्यामुळे शासनाने त्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी केली.