युतीचा ‘ड्राय डे’!

By Admin | Updated: November 30, 2014 01:36 IST2014-11-30T01:36:29+5:302014-11-30T01:36:29+5:30

शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे.

Alliance's 'Dry Day'! | युतीचा ‘ड्राय डे’!

युतीचा ‘ड्राय डे’!

स्वामी आले नि गेले : खडसेंनी टाकला मिठाचा खडा
मुंबई : शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे. भाजपाचे स्वयंभू नेते सुब्रrाण्यम स्वामी हे अगंतुक पाहुणो म्हणून ‘मातोश्री’वर पायधूळ झाडून आले, तर केवळ मंत्रिमंडळापुरता नाहीतर युतीचा दीर्घकालीन विचार करून फॉम्यरुला ठरवावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सोडले तर दोन्ही पक्षांसाठी शनिवार तसा ‘ड्राय-डे’च ठरला! त्यातच शिवसेनेचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिठाचा खडा टाकला.
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण त्या चर्चेतून कोणतीही फलनिष्पत्ती न झाल्याने दोन्ही मंत्री रिकाम्या हातानेच मातोश्रीवरून परतले. काल अर्धवट राहिलेली चर्चा आज पुढे सुरू होईल, असे सांगितले जात असतानाच  ‘मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत भाजपाकडून  अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही,’ असे विधान शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रस्ताव आलेला नसताना मग काल दोन मंत्र्यांनी उद्धव यांच्याशी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली, हे कोणालाच कळू शकले नाही.
दरम्यान, सुब्रrाण्यम स्वामी यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा केली. उभयतांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही, मात्र  हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना-भाजपाने एकत्र येणो आवश्यक असल्याचे मत स्वामी यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे स्वामी यांना शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी भाजपाने अधिकृतपणो पाठविलेले नव्हते. ती त्यांची वैयक्तिक भेट होती, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. 
त्यामुळे स्वामी कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी मातोश्रीवर गेले, हे आणखी एक गूढच आहे.  (विशेष प्रतिनिधी)
 
आगामी काळात होणा:या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकात युतीचा फॉम्र्युला काय असेल हेही ठरविणो आवश्यक आहे. शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे हीच आमची भूमिका आहे. मात्र, सरकारमध्ये एकत्र बसायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकमेकांवर टीका करीत फिरायचे असे आघाडी सरकारमध्ये घडत होते. आमच्यात ते होऊ नये यासाठी फॉम्यरुला ठरणो गरजेचे आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
विस्तार होणारच
राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केवळ 1क् मंत्र्यांच्या आधारे अधिवेशनाला सामोरे जाणो शक्य नाही. किमान 3क् मंत्री असायला हवेत, असे सांगून त्यांनी आगामी विस्तार मोठा असेल असे संकेत दिले. त्यात शिवसेना असेल का याबाबत, ‘आमचा तसा प्रयत्न आहे,’ असे सांगून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. 
 
सहकारमंत्र्यांची चुप्पी!
वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना-भाजपाच्या चर्चेबाबत जाहीर वक्तव्य करू नये अशा स्पष्ट सूचना असल्याने आपण त्यावर काही बोलणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले. 

 

Web Title: Alliance's 'Dry Day'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.