युती तुटली हे चांगलेच झाले - अबू आझमी
By Admin | Updated: January 27, 2017 21:38 IST2017-01-27T21:38:33+5:302017-01-27T21:38:33+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 27 - शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी ...

युती तुटली हे चांगलेच झाले - अबू आझमी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी सरकारातील सहभागावर लात मारून बाहेर पडावे असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज नाशिक मध्ये व्यक्त केले. नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीसाठी आलेल्या आझमी यांची आज सायंकाळी वडाळा रोडवरील एका हॉटेल मध्ये पत्रकार परिषद झाली यावेळी आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकीय मतभेद होते, मात्र ते ठोस भूमिका घेत. उद्धव ठाकरे यांना अशी भूमिका घेता येत नसल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नसतांना केवळ त्यांच्या गुंडगिरी मूळे सरकार हवे तसे निर्णय घेते आणि बॉलिवूड ला सेटलमेंट करण्यास भाग पडते अशी टीका आझमी यांनी केली.
भाजपा वर जोरदार टीका करताना त्यांनी भाजप देशातील धार्मिक वातावरण कलुषित करत असल्याचे आझमी म्हणाले. नोटा बंदीचा सर्वाधिक फटका देशातील तळागाळातील नागरिकांना बसला आहे असेही ते म्हणाले. समाजवादी पार्टीतील वादाबाबत बोलतांना त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे समर्थन केले.
मुलायमसिंग आमचे नेते आहेत, मात्र वयोमानामुळे त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे असे पक्षाचे मत असल्याचेही अबू आझमी म्हणाले
https://www.dailymotion.com/video/x844q0i