शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

By यदू जोशी | Updated: March 28, 2024 06:24 IST

गडचिरोली, नाशिक, माढापासून मुंबई मतदारसंघापर्यंत कुरघोड्या सुरू असून शड्डू ठोकणाऱ्या नाराजांना आवरता औवरता नेतेमंडळींची दमछाक होताना दिसत आहे.

मुंबई : मोठ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात करताच पक्षांतर्गत कुरघोडींमुळे महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. गडचिरोली, नाशिक, माढापासून मुंबई मतदारसंघापर्यंत कुरघोड्या सुरू असून शड्डू ठोकणाऱ्या नाराजांना आवरता औवरता नेतेमंडळींची दमछाक होताना दिसत आहे.

नाशिकमध्ये माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी जाहीर होताच तेथील लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपण निवडणूक लढणारच, असे जाहीर केले. ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांची आपण एक-दोन दिवसात भेट घेऊ, पण निवडणूक लढविणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

'तुतारी'च वाजवणार माढ्यात मोहिते पाटील,शरद पवारांचा भाजपला धक्काभाजपने राज्यातील पहिल्याच यादीत माढा येथून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेले अकलूजचे मोहिते पाटील आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तुतारी वाजविणार, असे निश्चित झाले आहे.धैर्यशील मोहिते पाटील 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करुन मैदानात उतरणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी भाजपला एक धक्का दिला आहे.भाजप नेते आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीयांनी बंडखोरी करू नये, यासाठी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान राजकीय घडामोडी उशीरापर्यंत सुरू होत्या. आधी भाजपचे नेते आणि नंतर शरद पवार गटाचे नेते बंगल्यावर दाखल झाले होते.

सांगली आणि दक्षिण-मध्य मुंबईवरून काँग्रेसमध्ये खदखदसांगली व दक्षिण-मध्य मुंबईत शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने तेथील काँग्रेसची नेतेमंडळी कमालीची नाराज झाली आहेत.काँग्रेसची ही परंपरागत जागा कायम ठेऊन विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी आ. विश्वजित कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह दिल्ली गाठली. खरगे तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद व मोहन प्रकाश यांच्या त्यांनी भेटी घेतल्या.महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे. शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

नाशिकमध्ये महायुतीत तणावनाशिकवरून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे अडून आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा आपल्याकडेच घ्या, असा प्रचंड दबाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणला आहे. सातारच्या बदल्यात नाशिकची जागा छगन भुजबळ यांच्यासाठी सोडल्याच्या चर्चेने नवा द्वीस्ट आला आहे.

मविआत, महायुतीत धुसफूसपुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकत्यांनी सातारा मतदारसंघ दुसऱ्याला सोडू नका आणि माढा मतदारसंघातील उमेदवार बदला, अशी टोकाची भूमिका घेतली.त्याचबरोबर दोन्ही मतदारसंघातून नितीन पाटील आणि संजीवराजेंच्या उमेदवारीची एकमुखीही मागणी करण्यात आली.उत्तर-पूर्व मुंबईची जागा शिवसेनेकडे (संजय दिना पाटील) गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या (शरद पवार) कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली.प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल. त्यांनी उमेदवार जाहीर केले असले तरी पुन्हा विचार करावा, अशी विनंती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४