सामान्यांना उद्ध्वस्त करण्याचा युतीचा डाव
By Admin | Updated: April 8, 2015 02:10 IST2015-04-08T02:10:38+5:302015-04-08T02:10:38+5:30
‘अच्छे दिन’ आणण्याचे अमीष दाखवत राज्यात व केंद्रात सत्तेवर आलेल्या मंडळीचे खरे स्वरुप उघड झाले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांना

सामान्यांना उद्ध्वस्त करण्याचा युतीचा डाव
मुंबई : ‘अच्छे दिन’ आणण्याचे अमीष दाखवत राज्यात व केंद्रात सत्तेवर आलेल्या मंडळीचे खरे स्वरुप उघड झाले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपा व सेनेचा डाव आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून राज्यातील सत्तेच्या बदलाची सुरुवात नारायण राणे यांच्या विजयाने करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.
वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. वांद्रे येथून राज्यातील तर बिहारच्या निवडणुकीतून केंद्रातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात होईल. युतीतील मतभेदामुळे दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील, असे नवे राजकीय भाकित त्यांनी यावेळी केले.
नवीन भू-संपादन कायदा हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे त्याला आम्ही कडाडून विरोध करणारच. राज्याचे नेतृत्त्व केंद्राच्या सूचनेप्रमाणे वागत आहे. त्यांच्या गैरकृत्याला जाब विचारण्यासाठी राणेंसारखा अभ्यासू नेत्याला विधानसभेत पाठविण्याची आपली जबाबदारी आहे. दरम्यान, आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून भावनिक आवाहन करणार नसल्याचे राणे म्हणाले.