कथित देवीभक्तावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 5, 2016 17:14 IST2016-09-05T17:14:56+5:302016-09-05T17:14:56+5:30
कथित देवीभक्तावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कथित देवीभक्तावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ५ - स्वत:ला देवीचा भक्त तसेच अंगात देवी येते असे भासवून एका महिलेस भुताळीण ठरवून तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी करणा-या कथित देवीभक्तावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित देवी भक्ताचे नाव बाळासाहेब आंबादास जाधव असे असून तो चांदवड तालुक्यातील भयाळेजवळील गवळी वस्तीवरील रहिवासी आहे.
शोभा शांताराम जाधव (३०, राग़वळी वस्ती, भयाळे, चांदवड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब जाधव हा स्वत:ला देवीचा भक्त समजत असून अंगात देवी येत असल्याचे सर्वांना भासवतो. शनिवारी (दि३) सायंकाळच्या सुमारास शोभा जाधव यांना संशयित बाळासाहेब जाधव याने तु भुताळीण आहेस, मला तंत्र-मंत्र येतात त्याने मी तुला संपवून टाकील असे धमकी दिली़ यानंतर शोभा जाधव यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती निर्माण करून त्यांना शिवगाळ व दमदाटी केली़
या प्रकरणी वडनेर भैरव पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.