शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी अहवालावरून आरोप-प्रत्यारोप; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:12 IST

पडळकर, मंत्री वडेट्टीवार आमनेसामने

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला अंतरिम अहवाल देण्यास सांगितल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताचे रविवारी राजकीय पडसाद उमटले. अंतरिम अहवाल हा ओबीसी आरक्षणाला ‘खो’ देण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केली, तर पडळकर अर्धवट माहितीवर बोलत असल्याची टीका बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.पडळकर म्हणाले की, आयोगाला  इम्पिरिकल डाटा तयार करण्यास सांगितलेले असताना शासनाने मध्येच अंतरिम अहवालाचे खूळ काढले आहे. असा अहवाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. ओबीसी आरक्षण पुन्हा देण्याच्या प्रयत्नांना बगल दिली जात आहे. आयोगाचे कामच सुरू झाले नाही तर अंतरिम अहवाल कशाच्या आधारे देणार, असा सवालही त्यांनी केला.मंत्री वडेट्टीवार यांनी अंतरिम अहवालाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार व राज्य मागासवर्ग आयोगात मतभेद असल्याचा इन्कार केला. ते म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी राज्य सरकार योग्य पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि. १७) या संदर्भात सुनावणी आहे आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयOBCअन्य मागासवर्गीय जाती