शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हप्तेखोरीच्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी, संजय निरुपम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:51 IST

फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे  नेतेही सहभागी असल्याचा आरोप  संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आमने सामने आले आहेत.

मुंबई - फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे  नेतेही सहभागी असल्याचा आरोप  संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांची बाजू घेताना निरुपम यांनी हा आरोप केला आहे. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले, "फेरिवाले ही जागतिक समस्या आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मी फेरिवाल्यांना पाहिले आहे. ही फक्त मुंबईपुरती मर्यादित समस्या नाही. त्यामुळे नागरिकांनी फेरिवाल्यांऐवजी ही समस्या वाढवणाऱ्या पालिका प्रशासनावर टीका करावी. फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी गेली अनेक वर्षे संबंधितांशी चर्चा करत आङे. त्यांना परवाने देण्याची मागणी करत आहे. पण यासंदर्भात काहीही हालचाली होत नाही. कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हप्तेखोरी आहे. ज्यामध्ये मनसेचे नेतेही सहभागी आहेत." मुंबईत जेथे फेरीवाले कमकुवत असतील तेथे मनसेची दादागिरी चालेल. मात्र ज्या भारात फेरीवाले वरचढ असतील तेथे मनसेला मार खावाच लागेल असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.  तसेच मुंबईतून मनसेची दादागिरी मोडून काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.  दरम्यान,  मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केलंय. विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त संजय निरुपमांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय निरुपमांनी चिथावल्यामुळेच हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम बोलले होते की, 'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल'.  

टॅग्स :MumbaiमुंबईSanjay Nirupamसंजय निरुपम