मुख्यमंत्र्यांवर दुजाभावाचा आरोप
By Admin | Updated: August 20, 2015 00:57 IST2015-08-20T00:57:41+5:302015-08-20T00:57:41+5:30
ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेच्या आठ दिवसांनंतर ठाण्यात झालेल्या इमारत दुर्घटनेतील फक्त मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी एक लाखाचा निधी जाहीर

मुख्यमंत्र्यांवर दुजाभावाचा आरोप
पंकज रोडेकर, ठाणे
ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेच्या आठ दिवसांनंतर ठाण्यात झालेल्या इमारत दुर्घटनेतील फक्त मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी एक लाखाचा निधी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केडीएमसीची निवडणूक तोंडावर असतानाही ठाकुर्ली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर न करता ठाण्यातील मृतांच्या वारसांना प्रथम निधी जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिक ा हद्दीतील ठाकुर्ली येथील मातृकृपा या इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जखमी झाले होते. याबाबतचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. तर, त्यानंतर आठ दिवसांनी ठाणे, नौपाडा परिसरातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले आहेत. याबाबत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती पाठवली होती. मात्र, ठाकुर्लीप्रमाणे कोणताही प्रस्ताव सादर केला नसतानाही प्रत्येकी एक लाखाचा निधी मुख्यमंत्री निधीतून नुकताच जाहीर झाला असून तो ठाणे जिल्हा प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. मात्र, अद्यापही त्याचे वाटप केलेले नाही. शासकीय प्रक्रियेनुसार मृतांच्या वारसांची ओळख पटवून त्यानंतर निधीचा धनादेश मृतांच्या वारसांच्या नावे काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.