शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांविरोधात कारवाईच्या मागणीची याचिका फेटाळली; 'कोठडीतील मृत्यू प्रकरणातील आरोप असमर्थनीय' - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:30 IST

पोलिसांविरुद्धचे आरोप असमर्थनीय आहेत, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाला मान्यता दिली. सीबीआयने पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली असून ज्या व्यक्तींची मृत व्यक्तीशी झटपट झाली होती त्यांनाही मारहाणीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.

मुंबई : २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात मुलाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी मुलांच्या वडिलांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. 

पोलिसांविरुद्धचे आरोप असमर्थनीय आहेत, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाला मान्यता दिली. सीबीआयने पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली असून ज्या व्यक्तींची मृत व्यक्तीशी झटपट झाली होती त्यांनाही मारहाणीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, सीबीआयने स्पष्टपणे निष्कर्ष काढला आहे की, मृत्यू पोलिसांकडून मारहाणीमुळे झाला नाही, तर तो अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला. १३ मार्च रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने नमूद केले की, सीबीआयने या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करून पोलिसांनी मारहाण केली का, याचा शोध घेतला आणि सुरुवातीपासूनच उत्तर नकारार्थी होते.  कोणताही दखलपात्र गुन्हा न आढळल्याने न्यायालयाने सीबीआयच्या अहवालावर शंका घेण्याचे कारण नसल्याचे सांगत पोलिसांविरुद्धची याचिका फेटाळली.

नेमके प्रकरण काय?ऑक्टोबर २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी विजय सिंग याला एका भांडणाच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. एका जोडप्याने आरोप केला होता की, तीन पुरुषांनी त्या महिलेचा लैंगिक छळ केला. 

या प्रकरणातील दुसरा याचिकाकर्ता निर्मल सिंग हा स्वत:ला मारहाणीचा साक्षीदार असल्याचा दावा करत होता. विजयचे वडील हृदयसिंग यांचे वकील विनय नायर यांनी असा युक्तिवाद केला की,  त्यांच्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या क्रूर मारहाणी आणि अमानुष वागणुकीमुळे  झाला.

...म्हणून याचिका दाखलट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Court rejects plea for action against police in custodial death.

Web Summary : Bombay HC dismissed a petition seeking action against police after a man died in custody in 2019. The CBI report found no evidence of police brutality, concluding death was due to a heart attack. Court found the accusations unsupported.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस