शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

दाभोलकर कुटुंबीयांवरील आरोप धादांत खोटे; ‘अंनिस’चे स्पष्टीकरण, गेल्या वर्षीच अविनाश पाटील यांना विश्वस्तपदावरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:19 IST

Maharashtra News: अविनाश पाटील यांना अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवायांमुळे विश्वस्तपदावरून गेल्या वर्षीच काढले आहे. तसेच हमीद आणि मुक्ता हे ट्रस्टी नाहीत. त्यामुळे पाटील यांचे आरोप धादांत खोटे आहेत,’ असा प्रतिहल्ला Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti ट्रस्ट सचिव दीपक गिरमे यांनी केला आहे.

 सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व व्यवहार ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे केले जातात. अविनाश पाटील यांना अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवायांमुळे विश्वस्तपदावरून गेल्या वर्षीच काढले आहे. तसेच हमीद आणि मुक्ता हे ट्रस्टी नाहीत. त्यामुळे पाटील यांचे आरोप धादांत खोटे आहेत,’ असा प्रतिहल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्ट सचिव दीपक गिरमे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकात गिरमे यांनी म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ही नोंदणीकृत न्यासाच्या स्वरुपातील कायदेशीर व आर्थिक रचना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. ‘अंनिस’चे कार्य या ट्रस्टमार्फत चालते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत व नंतरही समितीचे सर्व आर्थिक व्यवहार हे ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत केले जातात. ट्रस्टच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रतापराव पवार अध्यक्ष आहेत. ट्रस्टमधील सर्व निर्णय चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात. तसेच अविनाश पाटील यांना विवेक जागर नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अंनिसचे नाव वापरू नये, यासाठी समज दिलेली आहे. त्यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर, आर्थिक संबंध नाही.

वैयक्तिक आकसापोटी पाटील यांनी हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने ट्रस्ट ताब्यात घेतला, असा आरोप केला आहे. तसेच हमीद, मुक्ता दाभोलकर ट्रस्टी नाहीत. त्यांनी तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही नवा पैसाही मानधन किंवा प्रवास खर्च घेतलेला नाही. ट्रस्टचे कार्यालय दाभोलकर कुटुंबीयांनी मोफत वापरण्यास दिलेल्या जागेत चालते. ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगली येथे कार्यालय आहे. ही जागा सोडता ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवर कुणी ताबा घेतला, हे अत्यंत खोडसाळ आणि असत्य आरोप आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.  

समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही...प्रा. डॉ. एन. डी पाटील यांच्या निधनानंतर पद रिक्त झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून व ‘अंनिस’ ट्रस्टच्या संमतीने संघटनेच्या हितचिंतक सरोज पाटील यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी सर्व पार्श्वभूमी समजावून घेत अध्यक्षपद स्वीकारले आहे. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. याच्याशी विवेक जागर ट्रस्टचे अविनाश पाटील यांचा संबंध नाही. राज्य पातळीवर कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस ही सर्व पदे रद्द केली आहेत. त्यामुळे समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही, असेही दीपक गिरमे यांनी स्पष्ट केले आहे. 

हमीद-मुक्ता गटाने ट्रस्ट ताब्यात घेतली : पाटील  ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा सात कोटींचा निधी असलेली ट्रस्ट ताब्यात घेतला आहे. तसेच आम्ही अजूनही डॉ. एन. डी. पाटील यांच्या दु:खात आहोत. त्यामुळे ‘अंनिस’च्या नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच येत नाही,’ असा आरोप कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Maharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीSatara areaसातारा परिसर