शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

सारा लग्नाचा खर्च माझा....तुम्ही फक्त पोरगी द्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:39 IST

हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे...

ठळक मुद्देवरपित्याची याचना : मुलींची संख्या घटल्याने ग्रामीण भागातील विवाह चक्रच पालटले 

शिरुर (कान्हूरमेसाई) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे  सध्या चक्र पालटले असून, आम्हाला हुंडा नको फक्त तुमची मुलगीच हवी, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यावर आलेली दिसून येत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतीला वाईट दिवस आले आहेत, त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी-समाधानाने नांदावी अशीच आस आई-वडिलांना असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात, लग्नकार्यात फिरताना तसेच नातेवाइकांमध्ये विचारपूस करताना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधूपित्याची नजर कमावत्या मुलाकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधूपिता  मुलांकरिता शोधमोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण शेतकरी पित्याची मुलगी  असो वा नोकरदार पित्याची, सर्वच जण शेतकरी  मुलांकडे दुर्लक्ष करीत आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्र,तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलीच्या पित्याचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहेच्छुक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यामागे नैैसर्गिक आणि शासनाच्या  अनस्थेने निर्माण झालेल्या कारणाप्रमाणेच शेतकºयांनी स्वत:भोवती  गुंडाळून घेतलेल्या सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत  असल्याचे  बोलले जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धूमधडाक्यात उरकण्याकरिता वाट्टेल ते करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबीयांना आता  बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळवण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे  मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे, तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरून मुलापेक्षा मुलगी बरी ,असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे. मुलीच्या शोधात वाढतेय वय....  शिरूर तालुक्यातील हजार पंधराशे लोकसंख्या  असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही  लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता  ३0 ते ३५ वर गेलेले दिसून येत आहे. परिसरात  अनेक गावांमधील तरुण मंडळी  मागील तीन वर्षांपासून लग्नाच्या प्रतीक्षेत  आहे. तरीही मुलगी मिळत नसल्याने  काही नवरदेवांनी  मुलगी पाहण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर, बार्शी, नांदेड, पूर्णा, या गावांकडे आपली शोधमोहीम सुरू आहे. काही मुलांनी तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देतो, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो फक्त मुलगी  द्या, असाही निर्णय  घेतल्याचे  सांगितले जाते, तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती तालुक्याचीच नाही तर इतर भागात हीच अवस्था आहे. ,

शेतकरी  नवरा नको,  पण शेती हवी....

 शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही वधूपिता तयार होत नाही, आधी नोकरीला  प्राधान्य  दिले जाते, मुलगा नोकरीवर असल्यास त्याला  मुलगी  देण्याकरिता होकार  दर्शवितात, परंतु काही  ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे का?   असाही  प्रश्न पुढे येतो. काहींना  नोकरीसोबतच  मुलाकडे  शेतीही  पाहिजे आहे, यावर  शेतकरी नवरा नको,  पण शेती हवीय, पण कशासाठी?  असा प्रश्न वरपित्यामध्ये उपस्थित होत आहे .

-----------

 

टॅग्स :Shirurशिरुरmarriageलग्नWomenमहिला