शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'वैद्यकीय'ची रुग्णालये सुपरस्पेशालिटी करणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:45 IST

मंत्रिपदाचा स्वीकारला पदभार

मुंबई-कोल्हापूर : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली सर्व रुग्णालये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांनी गुरुवारी मंत्रालयात पदभार स्वीकारला आणि कार्यालय प्रवेशही केला, त्यावेळी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल हे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. परंतु, अजूनही तिथे किडनी, लिव्हर, हृदय प्रत्यारोपण होत नाही. जे.जे. हॉस्पिटल यासह नागपूर येथील दोन्ही हॉस्पिटल, आयजीएम, छत्रपती संभाजीनगरचे घाटी हॉस्पिटल, कोल्हापूरचे सीपीआर, लातूर, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलला चांगल्या सोयी- सुविधा निर्माण करून देऊ.राज्यात १२ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये करायची होती. मी केंद्र सरकारचे आभार मानतो की, काही तांत्रिक त्रुटी असतानासुद्धा केंद्राने १० नवीन एमबीबीएस महाविद्यालयांतर्गत ९०० जागांना मान्यता दिली. या कॉलेजच्या इमारती, हॉस्पिटलच्या इमारती, यंत्रसामुग्री यासाठी फार मोठा निधी लागणार आहे. केंद्राकडून यासाठी निधी मिळविणे आणि राज्य सरकारच्या निधीमधून नवीन मंजूर या महाविद्यालयांना चांगल्या सोयी-सुविधा पुरविणे या कामांना प्राधान्यक्रम राहील. राज्यात काही आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालये सुरू केली आहेत. येणाऱ्या काळात त्यांचीही परिपूर्णता करण्याचे आव्हान आहे. देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय राज्यात सुरू केले आहे. तसेच युनानी पद्धतीचे पहिले शासकीय महाविद्यालय देखील राज्यात काढले आहे. या सगळ्याची पूर्तता करू आणि सबंध महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असे चिरंतन काम करण्याचा माझा प्रयत्न आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफhospitalहॉस्पिटल