शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:48 IST

लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देधर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन

पुणे : देशातील सर्व व्यवस्था जातीयवादी शक्तींनी ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केले. कर्नाटकातील जनता दलाचे सरकार सत्तारूढ होताना अशा शक्ती एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ते झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जनता दल कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा शुक्रवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, आमदार प्रा. शरद पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष व राज्याचे प्रभारी पीजीआर सिंधीया, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष सरिता मानकर, पुणे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, युवक प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे उपस्थित होते.देवेगौडा म्हणाले, भारतीय जनता पाटी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हे नेते एकत्र येण्याची चिन्हे होती, मात्र दुदैर्वाने ते साध्य झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा देशातील स्थिती बिघडली आहे. प्रत्येक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप होतो आहे. याचा सगळ्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे.कोळसे म्हणाले, सरकार त्यांचा छुपा अजेंडा अंमलात आणते आहे. निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी देशस्तरावर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सडून मरायचे की लढून हे ठरवण्याची वेळ आली आहे. देशातील वयोवृद्ध नेते रस्त्यावर येण्याची भाषा करत असताना युवकांनी घरात बसून राहू नये, आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सिंधिया, गडहिंग्लज नगरपालिकेच्या पक्षाच्या नगराध्यक्ष स्वाती काळे, शेवाळे, शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. ...........साठीच्या पुढील सर्व शेतकºयांना सरकारने दरमहा ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्यात तसेच देशात असलेल्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या सर्व नेत्यांबरोबर, मुळ जनता दलातून बाहेर पडून नवा पक्ष, संघटना स्थापन करणाºयांबरोबर चर्चा करावी. त्यांना देशाची सद्यस्थिती सांगावा व एकत्र येण्याचे महत्व पटवून द्यावे अशी सुचना यावेळी देवेगौडा, कोळसे यांनी कार्यकर्त्यांना केली.

टॅग्स :PuneपुणेH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाGovernmentसरकार