शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

‘अखिल भारतीय मागणी दिवस’

By admin | Updated: July 9, 2016 02:13 IST

गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १० जुलै हा ‘अखिल भारतीय मागणी दिवस’ म्हणून पाळत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या शासनापर्यंत

मुंबई : गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १० जुलै हा ‘अखिल भारतीय मागणी दिवस’ म्हणून पाळत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात ११ व १२ जुलै रोजी मोर्चे काढले जातील.सीटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशनच्या शुभा शमीम यांनी सांगितले की, ‘१० जुलैला रविवार असल्याने, पुण्यात ११ जुलैला, तर मुंबईतही ११ जुलैला मोर्चा काढला जाईल. एकूण २६ राज्यांमध्ये या वर्षी मोर्चे काढले जातील. देश पातळीवरील मागण्यांसोबतच स्थानिक पातळीवरील मागण्यांचा पाठपुरावा मोर्चाच्या निमित्ताने केला जाईल.दर तीन वर्षांनी केंद्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते. त्यानुसार, २००८ आणि २०११ साली शासनाने वाढ केली. मात्र, त्यानंतर २०१४ साली अपेक्षित मानधनवाढ झालीच नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली आहे. शिवाय राज्य पातळीवर दोन वेळा संप करत मोर्चे काढल्यानंतर, सरकारने मानधनवाढ व एकरकमी सेवासमाप्ती लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात सेवासमाप्ती लाभाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याची माहिती सीटूच्या आरमायटी इराणी यांनी दिली.प्रमुख मागण्याकेंद्र शासनाने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचे नियमितीकरण करावे व त्याला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचा दर्जा द्यावा, सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा, सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठी अनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा, सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा व उन्हाळ्याची १ महिन्याची सुट्टी मंजूर करावी, दिवाळीला सेविका, मदतनिसांना सेविकांच्या एका मानधनाइतका समान बोनस देण्यात यावा. (प्रतिनिधी)मानधनाचा प्रश्न कायमअंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केरळमध्ये अनुक्रमे १० हजार व ७ हजार, हरियाणात ७ हजार ५०० व ३ हजार ७०० आणि इतर राज्यांत अनक्रमे ७ हजार व ३ हजार ५००हून अधिक मानधन मिळत आहे. मात्र, येथील राज्य शासनाने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांची आश्वासनावरच बोळवण केली आहे. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांचे ४ ते ६ महिन्यांचे मानधन थकत आहे. संपातही उतरणारपुणे जिल्हा परिषदेवर दुपारी १२ वाजता निदर्शने करून, शहरी विभाग आयुक्तांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येतील, तर मुंबईतील आझाद मैदानात १२ जुलैला निदर्शने होतील. दरम्यान, सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरुद्ध कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या ९ आॅगस्ट रोजीच्या निदर्शनांमध्ये आणि २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपातही अंगणवाडी कर्मचारी सामील होतील.