शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

शेतकरी कर्जमुक्ती व इतर मागण्यांसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीचा राज्यभर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 5:34 PM

किसान सभेचा लॉंग मार्च व एक जूनचा शेतकरी संप यात मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तथा शेतीमालाला रास्त भावाच्या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १० जून रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुंबई- किसान सभेचा लॉंग मार्च व एक जूनचा शेतकरी संप यात मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तथा शेतीमालाला रास्त भावाच्या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १० जून रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी पावसाचे दिवस असतानाही या राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. राज्यभरातील २१ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.ऐतिहासिक शेतकरी संपाला एक जून रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले होते. एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालण्यात आले. पाच जून रोजी मोझाम्बिकची तूर, पाकिस्तानची साखर व बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणारे दूध तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवून आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, प्रहार, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शरद जोशी विचार मंच, लाखगंगा आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, शेतकरी कृती समिती, पीपल्स हेल्प लाईन व भारतीय कृषक समाज यासह विविध संघटना सामील झाल्या होत्या. आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने दूध दरप्रश्नी शासन आदेश काढला आहे. मात्र काढण्यात आलेल्या शासन आदेशात अनेक संदिग्धता आहेत. सहकारी दूध संघांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आहे. खासगी दूध कंपन्यांना हा आदेश लागू नाही. लॉंग मार्चच्या मान्य मागण्याचीही सरकारने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही, अशा या पार्श्वभूमीवर हे चक्क जाम आंदोलन करण्यात आले.दुधाला रास्त भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त व वीजबिलमुक्ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, बियाणे, कीटकनाशके व शेती आदाने निर्माते व विक्रेत्यांकडून शेतक-यांची होणारी लूटमार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. स्वस्त दरात शेती आदाने उपलब्ध करून द्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणारांच्या नावे करा, आकारी पड जमिनीचा प्रश्न सोडवा, कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्या व शेतक-यांसाठी पिक, पशु व कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकष संरक्षण दया या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.1 ते 10 जून या काळात झालेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मागण्यांची संपूर्ण सोडवणूक झाल्या शिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे संघर्ष समितीने जाहीर केले आहे. यावेळी डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी. गावीत, आ. बच्चू कडू, किसन गुजर, डॉ. अजित नवले, संतोष वाडेकर, अनिल देठे, विठ्ठल पवार, धनंजय धोरडे, अशोक सब्बन, एस. बी. नाना, कारभारी गवळी, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च