अपहरण करून मुलीची विक्री करणा:या चौघांना कारावास!

By Admin | Updated: December 7, 2014 01:07 IST2014-12-07T01:07:41+5:302014-12-07T01:07:41+5:30

पंधरा वर्षाच्या मुलीची विक्री करून तिचे शारीरिक शोषण करणा:या एका व्यक्तीसह तीन महिलांना चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी शिक्षा सुनावली. 2क्12 मध्ये बल्लारपुरात हे प्रकरण घडले होते.

All four of them kidnapped by the girl's sale! | अपहरण करून मुलीची विक्री करणा:या चौघांना कारावास!

अपहरण करून मुलीची विक्री करणा:या चौघांना कारावास!

चंद्रपूर :  पंधरा वर्षाच्या मुलीची विक्री करून तिचे शारीरिक शोषण करणा:या एका व्यक्तीसह तीन महिलांना चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी शिक्षा सुनावली. 2क्12 मध्ये बल्लारपुरात हे प्रकरण घडले होते.
माया पाटील (46), कला करमरकर (42) आणि शशीकला निखारे (4क्) व शरद सोलंकी (22) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत़   सबंधित मुलीची खरेदी करून तिचे शारीरिक शोषण करणा:या शरद सोलंकी (22) हा उत्तर प्रदेशातील उज्जैन जिल्हातील गामखेडी येथील रहिवासी आहे.
17 मे 2क्12 रोजी या तीनही महिलांनी बल्लारपुरातील गौरक्षण वॉर्डातील एका भिकारिणीच्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिची शरद सोलंकी याला 15 हजार रूपयांत विक्री केली होती. शरदने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 15 दिवसांनी तिला पुन्हा बल्लारपुरात आणून सोडले. पोलीस तपासात या बाबी उघड झाल्यावर चारही आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश माळी यांनी साक्षी पुरावे तपासल्यावर शनिवारी निर्णय दिला. 
न्यायालयाने या प्रकरणात सहभागी असलेल्या तिनही महिलांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली. तर, शरद सोलंकी याला सात वर्षे आणि 5क्क् रूपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे.  (प्रतिनिधी)

 

Web Title: All four of them kidnapped by the girl's sale!