शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:06 IST

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर: आम्ही सर्वजण सेफ, सुरक्षित आहोत, तीन जण वरती गंगोत्रीजवळ आहेत, मी खालच्या बाजूला फोन लावण्यासाठी आलो आहे, आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला जेवण व इतर सेवासुविधा वेळेवर मिळत आहेत, दोन ते तीन दिवसांनी आम्ही सोलापूरला येऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे त्या उत्तरखंड दुर्घटनेत अडकलेल्या सोलापूरच्या चार भाविकांनी. 

ओम साई ट्रॅव्हल्समार्फत हरिद्वारहून प्रवास करणारे धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोटे हे चार पर्यटक सध्या संपर्काबाहेर होते. त्यासंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून कुटुंबियांना दिली होती. मात्र दुपारच्या सुमारास त्या चौघांमधील एकाने कुटुंबियांना संपर्क साधून संवाद केला. आम्ही चार जण सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान, आज सकाळपासून जिल्हा प्रशासनाकडून त्या चौघांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न सुरू होते. “जखमींच्या यादीत या चार नागरिकांची नावे नसल्याने ते सुखरूप असावेत,” असा विश्वास खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला होता. खा. प्रणिती शिंदे या डेहराडून येथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून अडकलेल्या पर्यटकांविषयी माहिती मिळवण्याचे प्रयत्न करीत होत्या. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आहे. आता त्या चौघांना सुखरूप सोलापूरपर्यंत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्रUttarakhandउत्तराखंड