गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष
By Admin | Updated: April 25, 2016 13:58 IST2016-04-25T13:58:32+5:302016-04-25T13:58:32+5:30
बहुचर्चित कृषीभूषण गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे

गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष
>ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 25 – बहुचर्चित कृषीभूषण गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. महत्वाचं म्हणजे सर्व आरोपी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.
नोव्हेंबर 2011 मध्ये गणेश कुलकर्णी यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्याच शेतात संशयास्पदरित्या त्यांचा मृतदेह आढळला होता. गणेश कुलकर्णी यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गणेश कुलकर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. अनेक दिग्गज नेत्यांचे समर्थक या निवडणुकीत उभे असताना गणेश कुलकर्णी यांनी बाजी मारली होती. त्यामुळे राजकीय द्वेषातून हत्या झाल्याची शंका व्यक्त केली जात होती.