मद्यपी रुग्णाचा वॉर्डबॉयवर कात्रीने हल्ला

By Admin | Updated: May 14, 2017 05:32 IST2017-05-14T05:32:04+5:302017-05-14T05:32:04+5:30

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील वॉर्डबॉय रमेश पावरा याच्यावर शनिवारी दुपारी मद्यपान केलेल्या रुग्णाने कात्रीने हल्ला केला

Alcoholics attack wardrobes | मद्यपी रुग्णाचा वॉर्डबॉयवर कात्रीने हल्ला

मद्यपी रुग्णाचा वॉर्डबॉयवर कात्रीने हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील वॉर्डबॉय रमेश पावरा याच्यावर शनिवारी दुपारी मद्यपान केलेल्या रुग्णाने कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात पावरा जखमी झाले असून त्यांच्या डोक्यासह छाती, डाव्या दंडाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात सरकारी नोकरास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दुपारच्या सुमारास बेडशीट न दिल्याचा राग मनात धरून आरोपीने पावरा यांच्याशी हुज्जत व दमदाटी करण्यात सुुरुवात केली. याच रागात तेथील कात्रीने पावरा यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळेस आरोपीने मद्यसेवन केल्याचे तपासात आढळले असल्याची माहिती भायखळा पोलिसांनी दिली.
या हल्ल्यामुळे डॉक्टरांवर संतप्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून होणारे हल्ले सुरूच असल्याचे नव्याने उघडकीस आले आहे. डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांसंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला. मात्र सायंकाळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
>कामकाज बंद
उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतरही डॉक्टरांवरील हल्ले थांबलेले नाहीत, हे भायखळा रेल्वे रुग्णालयात शनिवारी घडलेल्या घटनेनंतर उघडकीस आले आहे. याचा निषेध करत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद केले.

Web Title: Alcoholics attack wardrobes