मद्यपी प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर

By Admin | Updated: December 11, 2014 01:49 IST2014-12-11T01:49:45+5:302014-12-11T01:49:45+5:30

कर्मचा:यांना मारहाण करणारे कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंदकुमार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

Alcoholic principal secretary on compulsory leave | मद्यपी प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर

मद्यपी प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर

नागपूर : सरकारी विश्रमगृहावर दारू पिऊन धिंगाणा घालत कर्मचा:यांना मारहाण करणारे कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंदकुमार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्याजागी सिकॉमचे बलदेवसिंग हे गुरुवारी सूत्रे हाती घेणार आहेत. या धिंगाण्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने दिले होते. 
केंद्र सरकारच्या, ‘नीरी’या संशोधन संस्थेच्या विश्रमगृहावर अरविंदकुमार यांनी दारू पिऊन मंगळवारी मध्यरात्री प्रचंड गोंधळ घातला होता. आपल्या विभागाच्या तीन कर्मचा:यांना चपलेने मारले. नीरीच्या कर्मचा:यांना देखील मारहाण केल्याचे आरोप आहेत. 
 
च्अरविंदकुमार यांनी जे असभ्य वर्तन केले ते सगळे विश्रमगृहावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे:याने टिपले आहे.
च् मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे अरविंदकुमार यांच्या गैरवर्तनाची चौकशी करणार असून त्यांनी मागणी केल्यास सीसीटीव्ही फुटेज शासनाला सोपविण्याची तयारी नीरीने दर्शविली असल्याचे सूत्रंनी सांगितले. 
 
अरविंदकुमार यांनी मंगळवारी सकाळी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या बंगल्यावर अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार यांच्याशी बोलताना घाणोरडे शब्द वापरल्याचे समजते. 
लाकसवार यांच्या बदलीचा आदेश काढून त्यांच्याजागी उपसचिव गुप्ते यांना अरविंदकुमार आणू इच्छित होते; पण कामगारमंत्र्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडल्याचे सूत्रंनी सांगितले.
 
अरविंदकुमार हे एका राज्यात निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आणि तिथे त्यांनी एका कर्मचा:याला मारहाण केली होती. या प्रकरणात ते निलंबित झाले होते पुढे ते सेवेत परतले.

 

Web Title: Alcoholic principal secretary on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.