मद्यपी चालकाने केला पोलिसांवर हल्ला

By Admin | Updated: September 26, 2016 20:51 IST2016-09-26T20:51:31+5:302016-09-26T20:51:31+5:30

कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान ३६ वर्षीय मद्यपी कारचालकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कफपरेडमध्ये घडली.

The alcoholic driver attacked the police | मद्यपी चालकाने केला पोलिसांवर हल्ला

मद्यपी चालकाने केला पोलिसांवर हल्ला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान ३६ वर्षीय मद्यपी कारचालकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कफपरेडमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी दीपककुमार बनवारीलाल याला कफपरेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनवारीलाल याचे वडील नेवीमधून निवृत्त झाले आहेत.

कफपरेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर परिसरात बनवारीलाल पत्नी आणि मुलीसोबत राहतो. त्याचे वडील नेवीतून निवृत्त झाले आहेत. त्याने स्वत:ची हुंदाई कार (क्रमांक एम.एच ०१, सी-जे ०१७९) ओलासाठी लावली होती. रविवारी रात्रीपासून कफपरेड येथील गणेश मूर्ती नगर परिसरात कफपरेड पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान नाकाबंदी सुरू होती. यावेळी पोलीस निरीक्षक रावसाहेब वैद्य, एपीआय पवार, पीएसआय घेवडेकर, पी. शिंदे यांच्यासह दोन महिला अंमलदारांसह आठ जण तपासणी करत होते. दरम्यान दारूच्या नशेत कारमधून भरधाव वेगाने येत असलेल्या बनवारीलालला पोलिसांनी अडविले.

यावेळी त्याच्या गाडीत पत्नी आणि मुलगी होते. ते विरारहून घरी परतत होते. वैद्य यांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र बनवारीलाल याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आव्हाड यांनी गाडीची तपासणी सुरू करताच बनवारीलाल याने हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वैद्य यांच्या गणवेशावरील नेम प्लेटही त्याने ओढली.
'मै राहुल नार्वेकर का कार्यकर्ता हूू.. मुझे कोई हाथ नही लगा सकता. मेरे पिताजी नेवी मे थे', असे म्हणत तो पोलिसांना धक्काबुक्की करत होता. तब्बल अर्धा तास त्यांच्यात हुज्जत सुरु होती. अखेर पहाटेच्या सुमारास त्याला कफपरेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची कार पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कफपरेड पोलिसांनी दिली.

Web Title: The alcoholic driver attacked the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.