मद्यपार्ट्यांचे पेव
By Admin | Updated: January 5, 2016 02:51 IST2016-01-05T02:51:57+5:302016-01-05T02:51:57+5:30
राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या

मद्यपार्ट्यांचे पेव
चेतन ननावरे , मुंबई
राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या २ हजार ९०४ पार्ट्या झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या नशाबंदी महामंडळापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पाच महानगरांमध्ये मद्याच्या सर्वाधिक पार्ट्या मुंबईच्या उपनगरांत झाल्याचे समजते. पूर्व आणि
पश्चिम उपनगरांत डिसेंबर महिन्यात पाच महानगरांच्या तुलनेत
५० टक्क्यांहून अधिक पार्ट्या झाल्या. मुंबई शहर आणि उपनगरांतील पार्ट्यांची आकडेवारी एकत्र केल्यास ही टक्केवारी ८० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नशाबंदी मंडळाला मुंबईत अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. मुंबई उपनगरांत
१ हजार ७०१ पार्ट्यांची नोंद झाली असून, शहरातही मद्याचा समावेश असलेल्या ७५३ पार्ट्या झाल्या. म्हणजेच एकट्या मुंबापुरीत २ हजार ४५४ पार्ट्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात ३२३, नागपूरमध्ये ६६ आणि नाशिकमध्ये
६१ ठिकाणी ओल्या पार्ट्यांची परवानगी घेतली होती. याशिवाय या पाचही महानगरांत विनापरवानगी अनेक पार्ट्या झाल्या.
सरकारने थर्टीफर्स्टला रात्रभर बार सुरू ठेवायची परवानगी देऊन दारूला एक प्रकारे प्रतिष्ठाच दिली आहे. त्यामुळे व्यसन न करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी नशाबंदी विरोधातील प्रबोधन चळवळीत उतरायला हवे. त्याशिवाय दारूचे विदारक सत्य समोर येणार नाही.
‘थर्टीफर्स्ट म्हणजेच दारू-फर्स्ट’ ही व्याख्या बदलत नाही, तोपर्यंत दारूचे प्रमाण घटणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली.