अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

By Admin | Updated: August 15, 2015 00:42 IST2015-08-15T00:42:02+5:302015-08-15T00:42:02+5:30

खुल्या भूखंडावरील अतिक्रमकांना त्याच जागेवर कायम करावे, तसेच शालेय पोषण आहाराचे वादग्रस्त कंत्राट रद्द न करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंचे नगरसेवक

Akolatan thrown on the mayor and sliced ​​and khichadi | अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

अकोला : खुल्या भूखंडावरील अतिक्रमकांना त्याच जागेवर कायम करावे, तसेच शालेय पोषण आहाराचे वादग्रस्त कंत्राट रद्द न करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंचे नगरसेवक व अतिक्रमकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. या वेळी विरोधकांनी महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारीवर चप्पल भिरकावली व खिचडीही फेकली
शिक्षण विभागाने शालेय पोषण आहाराचा पुरवठा आदेश देताना पात्र महिला बचत गटांना डावलल्यामुळे हे कंत्राट रद्द करून प्रक्रिया नव्याने राबवण्याचा निर्णय आयुक्त सोमनाथ शेटे व सत्ताधारी पक्षाने घेतला होता; मात्र हे कंत्राट कायम ठेवण्याची मागणी करीत महिला बचत गट आणि तुकाराम चौकातील अतिक्रमकांनी सभागृहात शिरकाव केला.

Web Title: Akolatan thrown on the mayor and sliced ​​and khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.