अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

By Admin | Updated: August 14, 2015 23:26 IST2015-08-14T23:26:24+5:302015-08-14T23:26:24+5:30

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष आक्रमक; गुन्हे दाखल.

Akolatan thrown on the mayor and sliced ​​and khichadi | अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

अकोल्यात महापौरांवर भिरकावली चप्पल आणि खिचडी

अकोला : खुल्या भूखंडावरील अतिक्रमकांना त्याच जागेवर कायम करावे, तसेच शालेय पोषण आहाराचे वादग्रस्त कंत्राट रद्द न करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेस, भारिप-बमसंचे नगरसेवक व अतिक्रमकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांच्यावर चप्पल भिरकावली व खिचडीही फेकली शिक्षण विभागाने शालेय पोषण आहाराचा पुरवठा आदेश देताना पात्र महिला बचत गटांना डावलल्यामुळे हे कंत्राट रद्द करून प्रक्रिया नव्याने राबवण्याचा निर्णय आयुक्त सोमनाथ शेटे व सत्ताधारी पक्षाने घेतला होता; मात्र हे कंत्राट कायम ठेवण्याची मागणी करीत महिला बचत गट आणि तुकाराम चौकातील अतिक्रमकांनी सभागृहात शिरकाव केला. यावेळी विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई, भारिपच्या माजी नगरसेविका वंदना वासनिक यांच्यासह नागरिकांनीही सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. यादरम्यान महापौर देशमुख, उपमहापौर मापारी यांच्यावर चप्पल आणि खिचडी भिरकावण्यात आली. अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी परिस्थिती हाताळून, अतिक्रमकांना सभागृहाच्या बाहेर काढले. याप्रकरणी नगर सचिव जी.एम. पांडे यांच्या तक्रारीवरून विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिपचे गटनेता गजानन गवई, काँग्रेस नगरसेविका उषा विरक, भारिपच्या माजी नगरसेविका वंदना वासनिक यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Web Title: Akolatan thrown on the mayor and sliced ​​and khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.