अकोल्यात ट्रक-क्रूझरच्या धडकेत ८ जण ठार

By Admin | Updated: November 26, 2014 15:16 IST2014-11-26T13:07:32+5:302014-11-26T15:16:43+5:30

अकोल्यातील कुरूमजवळ ट्रक आणि क्रूझरची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले आहेत.

In Akolat, trucks and crews killed 8 people | अकोल्यात ट्रक-क्रूझरच्या धडकेत ८ जण ठार

अकोल्यात ट्रक-क्रूझरच्या धडकेत ८ जण ठार

>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २६ - अकोल्यातील कुरूमजवळ ट्रक आणि क्रूझरची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले आहेत. बुधवारी पहाटे अमरावती- अकोला मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात  आठ जणांना आपला जीव गमवावा लागला असून तीन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
मृत नागरिक हे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.  माणिक नारायण पाटील, अरविंद माणिक पाटील, सचिन माणिक पाटील, प्रभाकर बोर्ले, वसंत महादेव पाटील, भास्कर नीळकंठ पाटील हे मृत नागरिक तांदळवाडी येथील आहेत. तर दाताळा येथील प्रकाश पाटील, खरबाडी येथील भास्कर रामा किन्नगे यांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहनचालक शंकर पाटील हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: In Akolat, trucks and crews killed 8 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.