शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

देशपातळीवरील स्पर्धेत अकोल्यातील विद्यार्थिनींनी बनविलेला ‘रोबोट’ ठरला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:27 IST

देशपातळीवरील स्पर्धेत चकमलेल्या या विद्यार्थीनी आता अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

ठळक मुद्देमुंबई लिगो एज्युकेशन ही आॅर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीगचे आयोजन करीत असते.या लीगमध्ये मनूताई कन्या शाळेतील १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले.

अकोला : मुंबई लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या देशपातळीवरील ‘फर्स्ट लिगो लीग’ स्पर्धेत अकोल्यातील मनूताई कन्या शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी बनविलेला दैनंदिन समस्यांचे निराकरण करणारा ‘रोबोट’ ला पहिला क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील स्पर्धेत चकमलेल्या या विद्यार्थीनी आता अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.मुंबई लिगो एज्युकेशन ही आॅर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीगचे आयोजन करीत असते. या लीगमध्ये यंदा शहरातील समस्या आणि त्याचे निराकरण हा विषय घेतला असून, ही स्पर्धा १८ व १९ जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. या लीगमध्ये मनूताई कन्या शाळेतील १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यासाठी लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले. या विद्यार्थिनींना किट्सच्या संचालक व रोबोटिक्सच्या तज्ज्ञ काजल राजवैद्य, शिक्षक विजय भट्टड यांनी तसेच त्यांच्या सामाजिक बांधीलकी विभागानेसुद्धा मार्गदर्शन व मदत केली. या विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने छोट्या पाटर््सचा वापर करून रोबोट तयार केला असून, त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग स्वत: तयार केले आहे.एकही दिवस सुटी न घेता, या विद्यार्थिनींनी रोबोटची निर्मिती केली. रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. शहरालगतच्या छोट्या गावांमधून येणाºया विद्यार्थिनींकडे आॅटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बºयाचदा या विद्यार्थिनी शाळेत पायी येतात. रोबोटच्या उपयोगिता सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनत घेतली असून, इंग्रजीमध्ये त्यांनी छान मांडणी केली आहे. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांचेही मार्गदर्शन लाभले.

काय काम करतो ‘रोबोट’!विद्यार्थिनींनी बनविलेला रोबोट ट्रॅफिक जाम, नैसर्गिक आपत्ती, संकटात सापडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो. यासोबतच झाडांवर ट्री हाउस तयार करण्याचे काम करतो. क्रेन चालविण्यासाठी, बांधकाम साहित्य, मटेरियल्स पोहोचविण्यासाठीसुद्धा रोबोटची मदत होते. याशिवाय हा रोबोट उंचीवरसुद्धा चढू शकतो.या विद्यार्थिनींनी बनविला ‘रोबोट’!शहरातील ११0 वर्षे जुन्या मनूताई कन्या शाळेत शिकणाºया रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे, प्रणाली इंगळे यांनी सांघिक भावनेतून हा रोबोट बनविला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीRobotरोबोट