अकोला राज्यात सर्वाधिक ‘हॉट’!

By Admin | Updated: May 2, 2016 00:41 IST2016-05-02T00:41:23+5:302016-05-02T00:41:23+5:30

गेल्या २४ तासांत अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५ अंशावर पोहोचले आहे. राज्यातील अन्य ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत अकोल्यात नोंदविण्यात आलेले तापमान सर्वाधिक

Akola has the highest 'hot' in the state! | अकोला राज्यात सर्वाधिक ‘हॉट’!

अकोला राज्यात सर्वाधिक ‘हॉट’!

अकोला : गेल्या २४ तासांत अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५ अंशावर पोहोचले आहे. राज्यातील अन्य ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत अकोल्यात नोंदविण्यात आलेले तापमान सर्वाधिक आहे. दरम्यान, येत्या मंगळवार व बुधवारी विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.एप्रिलमध्ये विदर्भातील सरासरी तापमान प्रचंड वाढले होते. मे महिना सुरू होताच या तापमानात आणखी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत अकोल्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

Web Title: Akola has the highest 'hot' in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.