अकोला जिल्ात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के
By Admin | Updated: June 17, 2014 20:21 IST2014-06-17T19:49:41+5:302014-06-17T20:21:27+5:30
अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्ातील ४१८ शाळांपैकी ४१ शाळांमधील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अकोला जिल्ात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के
अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्ातील ४१८ शाळांपैकी ४१ शाळांमधील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
अकोला तालुक्यातील खडकी येथील पंजाबराव पाटील काळे विद्यालय, माऊंट कार्मेल, दिनकर रघुनाथ पाटील माध्यमिक विद्यालय गांधीनगर, शंकरलाल आ. अग्रवाल इंग्लिश स्कूल, कोठारी कॉन्व्हेंट, बाल शिवाजी माध्यमिक विद्यालय, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, दयानंद अँग्लो वैद्यिक कॉन्व्हेंट, मांगीलाल शर्मा विद्यालय, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, मोठी उमरी येथील स्व. उत्तम दौलत भारती विद्यालय, गुरुनानक कॉन्व्हेंट, लिटिल स्टार हायस्कूल, मुस्लीम उर्दू हायस्कूल हबिबनगर, दी नोएल इंग्रजी माध्यमिक शाळा कौलखेड, श्री दामासाहेब मेश्राम विद्यालय तारफैल, खंडेलवाल इंग्लिश हायस्कूल डाबकी रोड, सेंट एंज इंग्लिश मेडियम स्कूल हिंगणा रोड, एस. इंग्लिश स्कूल शिलोडा, डवले माध्यमिक विद्यालय मोठी उमरी, आय.एम. खंडेलवाल मेमोरिअल हायस्कूल गौरक्षण रोड, मॉर्डन इंग्लिश स्कूल गोवर्धन प्लॉट, स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी या शाळांचा समावेश आहे. अकोला तालुक्यातील २४ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. आकोट तालुक्यातील रेल येथील बुर्हानिया उर्दू हायस्कूल, अडगाव खु. येथील श्री अरविंद माध्यमिक शाळा से. पॉल अकादमी आणि वसुंधरा ज्ञानपीठ आदी शाळांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यातील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ आणि शेगाव येथील गुरुकुल ज्ञानपीठ शाळांचा निकाल १00 टक्के लागला. बार्शिटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील श्री संत बनाबाई महाराज विद्यालयाच निकाल १00 टक्के लागला आहे. बाळापूर तालुक्यातील गायगाव येथील नॅशनल मिलिटरी स्कूल, बाळापूर येथील श्रीदीक्षा इंग्लिश स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल वाडेगाव, श्री बालाजी इंग्लिश मेडियम स्कूल वाडेगाव या शाळांचा निकाल १00 टक्के लागला. पातूर तालुक्यातील बोडका येथील साईबाबा विद्यालयाचे १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मूर्तिजापूर तालुक्यातील श्री वेंकटेश बालाजी विद्यालय, उर्दू माध्यमिक विद्यालय उमरी अरब, हिरपूर येथील पी.एम.एस. केंद्र इंग्लिश मेडियम स्कूल आणि श्रीमती सरला राम काकनी एड्यू. ॲकॅडमी या शाळांचा निकाल १00 टक्के लागला. (प्रतिनिधी)