शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील भांडे व्यापारी पोलिसांच्या रडारवर!

By admin | Updated: August 6, 2016 02:06 IST

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे दक्षता, जिल्हय़ातील व्यापा-यांची मागविली माहिती.

सचिन राऊतअकोला, दि. ५ : शेतातील विहिरीवरील स्प्रिंकलर नोझल, स्प्रिंकलर पाइप, अँल्युमिनियमचे पाइप दुचाक्यांचे अँल्युमिनियम आणि तांबे यासह तांब्याचे भांडे व कॉपर चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हे महागडे साहित्य जिल्हय़ातील काही ठिकाणी खरेदी-विक्री क रण्यात येत असल्याच्या संशयावरून अकोला पोलिसांनी जिल्हय़ातील भांडे व्यापार्‍यांची माहिती मागविली आहे. यामधील काही भांडे व्यापारी पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.शहरासह जिल्हय़ात दुचाकी चोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. या चोर्‍यांसोबतच घरातील तांबे, पितळ, अँल्युमिनियमच्या भांडे चोरीचाही भुरट्या चोरट्यांनी सपाटाच लावला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आणि भारत संचार निगम लिमिटेडचे कॉपरचे तार आणि तांब्याचे वायर चोरट्यांकडून मोठय़ा प्रमाणात चोरी करण्यात येत आहेत. दुचाक्यांचे तांब्याचे आणि अँल्युमिनियमचे स्पेअर पार्ट जिल्हय़ातील काही भांड्यांचा भंगार व्यवसाय करणारे व्यापारी खरेदी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून अकोला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्हय़ातील चोरीचे भांडे खरेदी-विक्री करणार्‍या भांडे व्यापार्‍यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठय़ा भांडे व्यापार्‍यांची आणि भांड्याचा भंगार व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांची एका विशेष आराखड्यात माहिती गोळा करण्याचे काम अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. अँल्युमिनियम, तांबे, कॉपर हे भांडे बाजारात मोठय़ा महागड्या किमतीने विकल्या जातात; मात्र हाच चोरीचा माल व्यापार्‍यांकडून अध्र्या किमतीमध्ये खरेदी करण्यात येत असून त्यानंतर त्यापासून विविध भांडे तयार करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दुचाक्यांचे चेसीस पाण्यात फेकल्या जाते तर इतर सर्व लोखंड, अँल्युमिनियम आणि तांबे याचे पाणी करून ते भांडे बनविण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती आहे. याच माहितीच्या आधारे अकोला पोलिसांनी जिल्हय़ातील भांडे व्यापार्‍यांची सखोल चौकशी सुरू केली असून त्यांची सर्वच माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.