अकोला- अकोट फैलमध्ये दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: October 24, 2016 00:02 IST2016-10-24T00:02:35+5:302016-10-24T00:02:35+5:30
अकोट फैल येथील भीम चौकात एक ऑटो अडविल्यावरून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी रातरी 11 वाजता घडली

अकोला- अकोट फैलमध्ये दोन गटात हाणामारी
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 23- अकोट फैल येथील भीम चौकात एक ऑटो अडविल्यावरून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी रातरी 11 वाजता घडली.
अकोट फैल मधील अशोक नगरमध्ये असलेल्या भीम चौक येथून याच परिसरातील एक ऑटो चालक त्याचा ऑटो घेऊन जात असताना त्याला चौकातील काही युवकांनी अडविले, ऑटोचालकाने विचारणा केली असता त्यांनी अश्लील शिवीगाळ सुरु केली, ऑटो चालकाने याचा विरोध करताच ऑटोचालक आणि दुसऱ्या गटात तुफान हाणामारी झाली, या हाणामारीतच दगडफेकही सुरु झाल्याने 2 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठो सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले, या दगडफेक आणि हाणामारी प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाली, या हाणामारी आणि दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे, यावेळी घटनस्थळावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, ठाणेदार अनिल ठाकरे तातडीने दाखल झाले होते. 7 जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यात येत आहे. क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचे पोलिसांचे म्हणने आहे, या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.