सोलापूर - राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आता समोर येत आहे. मात्र सोलापूरातील अक्कलकोट येथे मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यानी जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषाबाजी आणि घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. त्याशिवाय निकालापूर्वीच अभिनंदनाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यातून भाजपा कार्यकर्त्यांचा अतिउत्साह दिसून येत आहे.
सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सर्व नगरपरिषदेत भाजपाने निवडणूक लढवल्या आहेत. अक्कलकोट येथे भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर शहरात लावले आहे. भाजपा उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी अभिनंदन करणारे पोस्टर लावले आहेत. शहरातील चौकाचौकात हे बॅनर लागले आहेत. अक्कलकोट येथे भाजपाविरुद्ध शिंदेसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. याठिकाणी अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. परंतु मतमोजणीपूर्वीच विजयाचे बॅनर झळकावत भाजपा कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास दाखवला आहे. Maharashtra Election Results 2025 Live: चांदा ते बांदा नगरपरिषद अन् नगरपंचायतीमध्ये कुणाची सत्ता?; मतमोजणीस सुरुवात
सकाळी १० वाजता याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली असून एकूण ९८ टेबलांतर मोजणी पार पडत आहे. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण साडेचारशे कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पहिल्या फेरीस अर्धातास, तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीस १५ मिनिटांचा वेळ लागतील. त्यामुळे साडेअकरा ते बारापर्यंत सर्व नगरपरिषदांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व नगरपरिषदांमध्ये एकही टपाल मतदान न झाल्याने टपाल मते मोजण्यासाठी स्वतंत्र टेबल नसेल. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ४१७ कर्मचारी तसेच टेबलांच्या संख्येच्या १० टक्के अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचेही डोके यांनी सांगितले. मतमोजणीनिमित्त रविवारी (२१ डिसेंबर) आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अक्कलकोट येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एक उपविभागीय पोलिस अधिकारी, एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, तीन पीएसआय यांच्यासह १० पोलिस अधिकारी, ६० पोलिस कर्मचारी, ६० होमगार्ड आणि एक एसआरपी पथक तैनात करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष किंवा विजयी मिरवणूक काढण्यास बंदी आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विनापरवानगी मिरवणूक काढल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
Web Summary : Before the Akkalkot Nagar Parishad election results, BJP workers celebrated with fireworks and banners, anticipating victory. This display of overconfidence occurred amidst a three-way contest against Shiv Sena and Congress, raising eyebrows before the official count.
Web Summary : अक्कलकोट नगर परिषद चुनाव नतीजों से पहले, भाजपा कार्यकर्ताओं ने जीत की उम्मीद में पटाखे और बैनर के साथ जश्न मनाया। शिवसेना और कांग्रेस के खिलाफ त्रिकोणीय मुकाबले के बीच यह अति आत्मविश्वास चर्चा का विषय बना।