शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण, दमदाटी करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:08 IST

Kalyan Crime News: घराबाहेर धूप पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून शेजारील मराठी कुटुंबीयांना मारहाण करून दमदाटी करणाऱ्या सरकारी कर्मचारी असलेल्या अखिलेश शुक्ला नावाच्या अमराठी व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हे

घराबाहेर धूप पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून शेजारील मराठी कुटुंबीयांना मारहाण करून दमदाटी करणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या अमराठी व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच हा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला होता. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन देत आरोपीवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. सोबतच अखिलेश मिश्रा याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आल्याचीही माहिती दिली होती. 

 एमटीडीसीमध्ये कार्यरत असलेल्या अखिलेश शुक्ला याच्या कुटुंबीयांचा धूप पेटवण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर अखिलेश शुक्ला याने १० ते १२ जणांच्या गुंडांचं टोळकं बोलावून सोसायटीमधील तीन जणांना मारणाह केली होती. या मारहाणीत अभिजित देशमुख, धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले होते.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तसेच दोन्हीकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारावर गुन्हा दाखल केला  होता.

दरम्यान, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर गायब असलेल्या अखिलेश शुक्ला याने सोशल मीडियावरून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. आपली पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, आपण स्वत:ला मराठी भाषिक समजतो, असा दावा केला होता. तसेच दोन शेजाऱ्यांमधील वादाला भाषिक रंग देण्यात आल्याचा दावाही त्याने केला. एवढंच नाही तर देशमुख कुटुंबीयांनी शिविगाळ केल्याचा तसेच आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही अखिलेश शुक्ला याने केला होता. मात्र आता पोलिसांना अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीmarathiमराठी