अकोला जिल्ह्यात अखिल भारतीय किन्नर मेळाव्याला प्रारंभ
By Admin | Updated: August 14, 2015 22:59 IST2015-08-14T22:59:51+5:302015-08-14T22:59:51+5:30
मुर्तिजापूर येथे आयोजन; मेळाव्याचा समारोप १८ ऑगस्ट रोजी.

अकोला जिल्ह्यात अखिल भारतीय किन्नर मेळाव्याला प्रारंभ
मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) : येथील सिंधी कॅम्प भागातील सिंधी भवनमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय किन्नर मेळाव्याला प्रारंभ झाला. मेळाव्यात देशभरातून किन्नर सहभागी झाले आहेत. मेळाव्याचा समारोप १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतात अनेक राज्यात किन्नर नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर यासह अनेक महत्त्वाच्या विविध राजकीय पदांवर कार्यरत आहेत. देशभरातील किन्नरांच्या मेळाव्याला मूर्तिजापूर येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. माता राणीच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून मेळाव्याला प्रारंभ झाला. दीप प्रज्वलन नेहा नायकने केले. देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात शांतता नांदावी, यासाठी मेळाव्यात प्रार्थना केली जाणार आहे. रविवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी मूर्तिजापूर शहरात माता राणीची कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप राम मंदिराजवळ केला जाणार आहे. मेळाव्यात बिलासपूर, रायगड, खरसिया, नेहाला, अमरावती, यवतमाळ, पांढरकवडा, खामगाव येथील किन्नर सहभागी झाले आहेत.