महापौरांनी घेतला नाही अजित पवार यांचा दूरध्वनी
By Admin | Updated: August 5, 2016 21:17 IST2016-08-05T21:17:08+5:302016-08-05T21:17:08+5:30
वाकड येथील पार्क स्ट्रीटला रस्त्यासाठी जागा देण्याचा विषयावरून महापौर शकुंतला धराडे आणि सत्ताधाऱ्यांत वादावादी झाली.

महापौरांनी घेतला नाही अजित पवार यांचा दूरध्वनी
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. ५ : वाकड येथील पार्क स्ट्रीटला रस्त्यासाठी जागा देण्याचा विषयावरून महापौर शकुंतला धराडे आणि सत्ताधाऱ्यांत वादावादी झाली. संबंधित विषय मंजूर करावा, असा दूरध्वनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्याने सभा तहकूब न करण्याचा विचार महापौरांचा होता. याचवेळी सभा तहकूब करण्याविषयी सूचना देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महापौरांना दूरध्वनी केला. मात्र, हा दूरध्वनी त्यांनी घेतला नाही. ह्यदादांपेक्षा साहेब मोठे,ह्ण असे उत्तर महापौरांनी माध्यमांना दिले.
महापौरांनी सभा तहकुबीची सूचना का स्वीकारली नाही, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती. या घटनेचा मागोवा घेतला असता तहकुबीवरून जे वादळ झाले, त्याचे कारण वाकड येथील पार्क स्ट्रीटला महापालिकेच्या आरक्षणातील रस्ता देण्याचा शहर सुधारणा समितीचा विषय आजच्या विषयपत्रिकेवर होता. हा विषय भाजपाच्या नेत्यासंदर्भातील एका बिल्डरचा आहे. त्यामुळे हा विषय मंजूर करायचा नाही, यावर सत्ताधाऱ्यांचे एकमत झाले. त्यांनी याबाबत महापौरांनाही सूचना दिली होती. मात्र, महापौरांनी सभा रेटून नेण्याचा पयत्न केला. यावरून महापौर आणि सत्ताधारी यांच्यात वादावादी झाली.
पहिली सभा तहकूब केली, त्या वेळी अँटी चेंबरमध्ये ही सभा तहकूब करायची आहे, अशी सूचना पक्षनेत्यांनी महापौरांना केली. त्यानंतर सभा सुरू होण्यापूर्वी याविषयीची सूचना देण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी महापौरांना दूरध्वनी केला. तो दूरध्वनी महापौरांनी घेतलाच नाही, याविषयी चर्चा महापालिका वर्तुळात होती.
सभा संपल्यानंतर आपण दादांचा फोन का स्वीकारला नाही? असे पत्रकारांनी विचारले असता, महापौर धराडे म्हणाल्या, ह्यह्यएका विषयासंदर्भातील विषय मंजूर करण्याची मोठ्या साहेबांची सूचना होती. याच संदर्भात दादांनीही फोन केला होता. माझ्या दृष्टीने दादांपेक्षा साहेबच मोठे आहेत. त्यांचा आदेश मी पाळण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा आदेश मी पाळला.ह्णह्ण