टीका करणे हा अजित पवार यांचा धंदा
By Admin | Updated: September 7, 2015 00:57 IST2015-09-07T00:57:38+5:302015-09-07T00:57:38+5:30
कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे,

टीका करणे हा अजित पवार यांचा धंदा
पिंपरी : कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील एका कार्यक्रमास दानवे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री अकार्यक्षम असल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता, दानवे यांनी पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या कालखंडात अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ ही तीन संकटे आली. मात्र यांच्या निवारणासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची परिस्थिती अतिशय तत्परतेने हाताळली आहे. दुष्काळ निवारणासाठी कधीही पैसे कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज घेऊ, मात्र शेतकऱ्यांना मदत करू.