...तर भाजपाविरोधी भूमिका घेऊ - अजित पवार

By Admin | Updated: November 26, 2014 17:10 IST2014-11-26T16:27:53+5:302014-11-26T17:10:14+5:30

भाजपाने इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे.

Ajit Pawar will take the role of anti-BJP | ...तर भाजपाविरोधी भूमिका घेऊ - अजित पवार

...तर भाजपाविरोधी भूमिका घेऊ - अजित पवार

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - भाजपाने इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचे केले नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये असेही त्यांनी म्हटले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा व शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या आरोपप्रत्यारोपांवर भाष्य केले. कोणाची तुलना कोणाबरोबर केली जाते यामध्ये लोकांना काहीच घेणेदेणे नसते. यापेक्षा शेतक-यांच्या व जनहिताची कामे करा असा सल्लाही त्यांनी भाजपा व शिवसेनेला दिला आहे. आगामी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात आंदोलन करु असे त्यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar will take the role of anti-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.