पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे विमान लँडिंग करताना अचानक हे विमान शेतात कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत अजित पवारांसह ४ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यात अजितदादांची शेवटची इच्छा काय होती याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी खुलासा केला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली होती. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच अजित पवारांचं निधन झाले.
अजित पवारांच्या निधनानंतर अंकुश काकडे यांनी म्हटलं की, अखेरच्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह माझ्याकडे केला होता. मी, विठ्ठलशेठ मणियार आणि श्रीनिवास पाटील तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत. नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात. साहेबांशी आपण बोला, दोन्ही राष्ट्रवादी एक होतील यादृष्टीने प्रयत्न करा असं अजितदादांनी म्हटलं होते. आम्ही आमच्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी आणि विठ्ठलशेठ सातत्याने करत होतो. मात्र दुर्दैवाने त्याला यश येऊ शकले नाही असं विधान काकडे यांनी केले.
राष्ट्रवादीत दुरावा का?
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले. त्यातील अजितदादांच्या नेतृत्वात एका गटाने भाजपासोबत सत्तेत बसणे पसंत केले. दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वातील एका गटाने विरोधात राहण्यावर भर दिला. भाजपासोबत जाण्यावरून काका पुतणे यांच्यात मतभेद होते. मात्र अलीकडच्या काळात हे संबंध पुन्हा सुधारत असल्याचे चित्र होते. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत भाजपाविरोधात निवडणूक लढवली. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. याच निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र होतील का अशी चर्चा सुरू झाली. जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न अजित पवारांना विचारला होता तेव्हा तुमच्या तोंडात साखर पडो असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीचे २ गट एकत्र आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा आणखी वाढली. मात्र दुदैवाने अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अजित पवारांनी दिला होता अखेरचा सल्ला
राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही, साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे नमूद करत अजित पवारांनी “धंदा-पाणी सांभाळा, आयुष्य नीट जगा असा सल्ला अजित पवारांनी मृत्यूपूर्वी दिला होता.
Web Summary : Before his death, Ajit Pawar urged uniting NCP factions. He emphasized focusing on business, education, and a virtuous life, advising against impulsive political ventures after receiving funds.
Web Summary : अपनी मृत्यु से पहले, अजित पवार ने एनसीपी गुटों को एकजुट करने का आग्रह किया। उन्होंने व्यवसाय, शिक्षा और सदाचारी जीवन पर ध्यान केंद्रित करने पर जोर दिया, और धन प्राप्त करने के बाद आवेगी राजनीतिक उपक्रमों के खिलाफ सलाह दी।